बिग बॉस

Big Boss Marathi 5: यावेळी एलिमिनेशनच्या जाळ्यात अडकले निक्की आणि अरबाज कोण होणार घरातून बेघर ?

Published by : Team Lokshahi

बिग बॉस मराठी 5 चा आता आठवा आठवडा सुरु झाला आहे. यादरम्यान काही जुन्या स्पर्धकांची एक्सीट झाली तर नवीन स्पर्धकांची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. तर नुकतेच आर्या आणि वैभव एलिमिनेट होऊन गेले आणि त्यांच्या मागोमाग आता संग्राम देखील काही वैद्यकीय अडचणीमुळे घरातून एलिमिनेट झाल्याचा पाहायला मिळाला. तर काल झालेल्या भाऊच्या धक्क्यात "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमातील होस्ट आणि कलाकाल डॉ. निलेश साबळे यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली तर "नवरा माझा नवसाचा 2" ची टीम पाहायला मिळाली.

कालच्या एपिसोडमध्ये घरातील स्पर्धकांची पत्रकार परिषद झाली ज्यात पत्रकारांकडून बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना काही बेधडक प्रश्न विचारण्यात आले. ज्याची जबरदस्त अशी उत्तरे घरातील स्पर्धकांनी दिली होती. ज्यामध्ये निक्की आणि जान्हवीच्या नात्यावर आणखी एकदा तडा जाताना पाहायला मिळाला. तर पुढे आजच्या भाऊच्या धक्क्यात घरातील एका सदस्याला घरातून बेघर करण्यात येणार आहे. आज पाच सदस्यांना एलिमिनेशनमध्ये ढकलण्यात आलेले आहे. ज्यात पाच ही सदस्य हे हटके खेळ खेळणारे स्पर्धक आहेत. ज्यात सुरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी पाहायला मिळाले आहेत.

तर पुढे आजच्या भाऊच्या धक्क्यात घरातील एका सदस्याला घरातून बेघर करण्यात येणार आहे. आज पाच सदस्यांना एलिमिनेशनमध्ये ढकलण्यात आलेले आहे. ज्यात पाच ही सदस्य हे हटके खेळ खेळणारे स्पर्धक आहेत. ज्यात सुरज चव्हाण, वर्षा उसगांवकर, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी पाहायला मिळाले आहेत. सर्वात आधी असा प्रश्न परडला होता की या पाच जणांमध्ये कोण एलिमिनेट होणार? मात्र कालच बिग बॉसकडून एक प्रोमो दाखवण्यात आला ज्यात सुरज चव्हाण, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर हे तिघे ही एलिमिनेशनपासून वाचले आहेत. मात्र अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये आज एकाला बिग बॉसचे घर सोडून जावे लागणार आहे. प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्यावेळेस बिग बॉस एलिमिनेट झालेल्या सदस्याचे नाव घेतात त्यावेळी निक्की मात्र ढसाढसा रडताना दिसली आहे. त्यामुळे निक्की की अरबाज कोण होणार घरातून बेघर याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी